Friday, June 19, 2026
Homeचंद्रपूरघुग्घुस येथे रावण दहनास आदिवासी बांधवांचा विरोध….-तणावाची स्थिती; चोख पोलिस बंदोबस्त…

घुग्घुस येथे रावण दहनास आदिवासी बांधवांचा विरोध….-तणावाची स्थिती; चोख पोलिस बंदोबस्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असून त्यांचे दहन करू नये; अशी आदिवासी समाजाने भूमिका घेतली.आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध करीत तीव्र आंदोलनाचा इशारा देत घुग्गुस शहरात आज निषेध मोर्चा काढला.या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.बहादे प्लॉट येथे रावण दहन करू देणार नाही; असा पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आसिफराजा हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले.तसेच दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले.

विजयादशमीच्या दिवशी आज रावणाचे प्रतिकात्मक दहन चंद्रपूर शहराजवळील घुग्घुस येथे पार पडणार होता.दरम्यान सकाळी आदिवासी बांधवांनी रावनदहनास विरोध केल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.अन्याय,अहंकारी,पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते.त्यानुसार हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. आज मंगळवारी २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी विजयादशमीच्या दिवशी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस शहरात बहादे प्लॉटमध्ये रावणाचे प्रतिकात्मक दहन करण्यासाठी सकाळी प्रतिमा तयार करण्यात येत होती.दरम्यान शहरातील आदिवासी बांधवांनी सकाळच्या साडेनऊ वाजताच्या सुमारास बहादे प्लॉटमध्ये येऊन रावण दहनास प्रचंड विरोध केला.

आदिवासी समाज बांधवांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेण्यात आले असून यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने कार्यवाही सुरू केली.शांती व सुव्यवस्था बिघडू नये; याकरीता चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असून त्यांचे दहन करू नये; अशी आदिवासी समाजाने भूमिका घेतली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!