उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- आपण सर्वांनी अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेला ‘पुष्पा’ चित्रपट बघितलेला असेलच; त्यातील सुपरहिट असलेला डायलॉग ‘पुष्पा…पुष्पा राज…झुकेगा नही साला…!’ याची खरी प्रचिती आजच्या घडीला गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील काही तालुक्यात दिसून येत आहे.ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ चित्रपटात लाल चंदनाची तस्करी चोरट्यांकडून केली जाते.तशाच प्रकारे गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील मौल्यवान सागवणांची तस्करी केली जात आहे.मौल्यवान सागवणांची तस्करी करण्यासाठी तस्करांकडून विविध युक्त्या वापरून सागवानांची चोरी केली जात आहे.
मौल्यवान सागवानांची तस्करी करण्यासाठी कधी पाणी प्रवाहाचे नाले तर कधी बैल बंडींचा वापर तर कधी तालुका सीमेवरून वाहणाऱ्या नदी मार्गांचा वापर केला जातो आहे.तसेच नाल्यात वा नदीमध्ये सागवानाची लाकडे बांधून; तराफे बनवून तस्करी केली जाते.काही दिवसांपूर्वी वनविभाग सिरोंचा अंतर्गत येत असलेल्या देचलीपेठा वन परिक्षेत्रातील दुर्गम भागातील कोंजेड नाल्यात सावागन लाकडे तस्करांनी लपवून ठेवली होती.त्यानुसार सदर लाकडे वन विभागाने ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई केली. लाकडांची किंमत ३ लाख ५७ हजार ९८१ रुपये एवढी होती.तालुका सीमेवरून वाहणाऱ्या नदीमार्गे तस्कर सागवनाची तस्करी करून तेलंगाणा, आंध्रप्रदेशात विक्री करीत असतात.
‘पुष्पा’ चित्रपटात कर्मचाऱ्यांवर जशी दगडफेक केली जाते; तशीच दगडफेक कारवाईसाठी धजवणाऱ्या अधिकारी,कर्मचारी वर्गांवर केली जाते.त्यामुळे ‘पुष्पा’ चित्रपटाची पुनः रावृत्ती होत आहे; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.मात्र पुष्पा भाऊ जशी चारचाकी वाहन खरेदी करतो; तशी वाहन कुणी खरेदी केला की काय; असा प्रश्न निर्माण झाला आहे.अशातच तस्करांवर अंकुश घालण्यास वनविभाग सिरोंचा वनविभाग क्षेत्रातील वन अधिकारी,वन कर्मचारी तसेच उपवनसंरक्षक ‘दबंग लेडी’ पूनम पाटे भारी पडतांना दिसून येत आहे.महत्वाचे म्हणजे, ‘शेर अकेलाही कॉफी है..! झुंड में तो सुव्हर आते है..!’ असे दिसून येत आहे.