Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरगडचिरोलीच्या महिलेची मूल शहरात आत्महत्या..

गडचिरोलीच्या महिलेची मूल शहरात आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गडचिरोलीच्या महिलेने मूल शहरात आत्महत्या केल्याची घटना काल, गुरुवारी १७ एप्रिलच्या दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने शहरात काहीकाळ एकच खळबळ उडाली होती.अधिक चौकशीअंती महिलेची ओळख पटली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.शीला शरद मसराम वय ६० वर्षे, गडचिरोली असे मृतक महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार,चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहराच्या बसस्थानक परिसराच्या मागे जवळच तलाव आहे. काल,गुरुवारी दुपारच्या सुमारास काही नागरिकांना तलावात महिलेचा मृतदेह तरंगतांना दिसून आला. सदरची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रमोद चौगुले ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.सुरुवातीला महिला कोण?आत्महत्या की हत्या? असा संशय बळावला होता.अशातच अधिक चौकशी केल्यानंतर महिलेची ओळख पटली व कुटुंबीयांना घटनेबाबत कळविण्यात आले.मृतक शीला मसराम ही मानसिकदृष्ट्या आजारी होती.उपचार करण्यासाठी गडचिरोली वरून बसने चंद्रपूरला निघाली.मात्र,मूल बसस्थानकावर उतरल्यानंतर ती थेट तलावाकडे गेली असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.सदर घटनेचा पुढील तपास मूल पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!