उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विविध प्रकारची विकास कामे स्वतः पुढाकार घेऊन व दुसऱ्यांची नावे समोर करून कामावरील मलाई खाण्याचे प्रकार ग्रामपंचायत,नगरपंचायत,नगरपरिषद व इतर शासकीय आस्थापनांमध्ये सुरू असल्याने काम करणारा नामधारी व मलाई खाणारा पदाधिकारी अशी अवस्था झाली आहे.
शासन स्तरारून विविध प्रकारची विकास कामे मंजूर केली जातात.कामांमध्ये रस्ते बांधकाम,नाली बांधकाम,बंधारे बांधकाम,विहीर बांधकाम व इतर बांधकामे शासकीय आस्थापनांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर केली जात आहेत.कामे मंजूर झाल्यानंतर हल्ली कामांच्या वाटपासाठी आस्थापनांमधील पदाधिकाऱ्यांमध्येच रस्सीखेच होत असल्याचे दिसून येते.
कामे तर वाटप केली जातात मात्र आस्थापनांमधील पद वा सदस्यत्व रद्द होऊ नये याकरिता शक्कल लढवली जाते.कामे तर स्वतः च घेतली जातात परंतु दुसऱ्या व्यक्तींची नावे समोर करून निकृष्ट दर्जाची कामे पूर्ण करून काही रक्कम खर्च तर काही रक्कम खिशात टाकली जात असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.विविध आस्थापनां बरोबरच रेती घाट लिलाव प्रक्रियेत सुद्धा अशा प्रकारची शक्कल लढवून शासनाची दिशाभूल केली जात आहे.दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने कामे केली असल्याचे दाखवून देयके काढली जातात मात्र खरा शिक्षक वेगळाच असतो.त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक खरे की खोटे लक्षातच येत नाही.
वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये शासनाची दिशाभूल करून विकास कामांमध्ये भकास कामे केली जात असल्याने अशांवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे जनसामान्यांतुन बोलल्या जात आहे.