उद्रेक न्युज वृत्त
कोरपना ता.प्र./नितेश केराम
कोरपना(चंद्रपूर):- कोरपना शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील सुरेश आपटे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास जवळपास ५३ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना आज २८ मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
अज्ञात चोरट्यांनी आपटे कुटुंबीय रात्री गाढ झोपेत असतांना संधीचे सोने केले आहे.घरामध्ये घुसून चोरट्यांनी कपाटात ठेवलेला सोन्याचा गोप (मंगळसुत्र),सोन्याची डल व चांदीचे जुने चाळ (जोडवे)असा एकूण ५३ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.आपटे कुटुंबीय रात्री गाढ झोपेत असल्याने कुठल्याही प्रकारची भनक त्यांना लागली नाही.मात्र पहाटे उठल्यानंतर घरातील कपाट उघडे व त्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.लगेच त्यांनी संपूर्ण साहित्य तपासून पाहिले असता ५३ हजाराचा ऐवज लंपास केल्याचे दिसून आले.सदर प्रकरणी कोरपना पोलीस ठाण्यात तत्कार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.पुढील तपास ठानेदार संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहेत.