Saturday, September 12, 2026
Homeकुरखेडाकोरची-कुरखेडा मार्गावर अज्ञात ट्रकची पिकअप वाहनाला धडक... - एकजण जागीच ठार तर...

कोरची-कुरखेडा मार्गावर अज्ञात ट्रकची पिकअप वाहनाला धडक… – एकजण जागीच ठार तर तीन वर्षीय बालकासह महिला गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-काही भटक्या जमातीचे कुटूंबीय सोबत जीवनावश्यक साहित्य तथा वस्तू घेऊन आपल्या चारचाकी वाहनाने गावोगावी फिरून एखाद्या गावात व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करून संसाराचा गाडा चालवीत असतात.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील भटक्या जमातीचे कुटूंबीय पिकअप वाहनाने गोंदिया जिल्ह्यातील देवरीवरून कुरखेडा मार्गे येत होते. दरम्यान,कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळील उतारावर समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,पिकअप वाहनातील एकजण जागीच ठार झाला.तर तीन वर्षीय बालकासह महिला गंभीर जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी घडली.अपघातात किशोर भोसीलाल सोनवाने वय ४५ वर्षे,रा.सालई खुर्द, ता.मोहाडी,जि.भंडारा असे जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर ३ वर्षीय ईश्वर सोनवाने व ४८ वर्षीय योगिता सोनवाने असे गंभीर जखमींची नावे आहेत.घटनेनंतर जखमींसह मृताला तात्काळ रुग्णवाहिकने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.जखमींवर उपचार सुरू असून,मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले.घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलिसांनी सुरू केला असून अज्ञात ट्रकचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!