Monday, August 17, 2026
Homeपुणेकोयता गँगचा नायनाट करण्यासाठी पोलिसांनी लढविली नवी शक्कल - कोयता घेण्यासाठीही लागणार आधार...

कोयता गँगचा नायनाट करण्यासाठी पोलिसांनी लढविली नवी शक्कल – कोयता घेण्यासाठीही लागणार आधार कार्ड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :- गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने दहशत माजवली असून पुणे पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करून सुद्धा कोयता गँगची दहशत कमी होत नाही. विशेष म्हणजे या कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत आहे.कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पुणे पोलिसांनी नवीन युक्ती काढली आहे. यापुढे शहरात कोयता घ्यायचा असेल तर त्या संबंधित व्यक्तीला आधारकार्ड द्यावे लागणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. यामुळे कोयता कोणी विकत घेतला याची माहिती पोलिसांकडे राहणार आहे.

अल्पवयीन मुलांचा या गँगमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असून त्यांच्यामार्फत अनेक ठिकाणी दहशत माजवली जात आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केल्यानंतर आता कोयता गँग पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या पुढे शहरात कुठेही कोयता घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला आधारकार्ड द्यावे लागणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांच्यावतीने शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येक कोयता विक्री खरेदी करणार्‍याला आता आधार कार्ड द्यावे लागणार आहे.

कोयता बाळगणार्याला पकडा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना पुणे पोलिसांनी आखली आहे.या योजनेनुसार,पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या गुंडाला पोलिसाने पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणाऱ्यास पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!