- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे सामाजिक बांधिलकीतून एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मेघनाथ उत्सवाला गावातील बुराडे परिवारातर्फे दीडशे वर्षापूर्वीची ऐतिहासिक परंपरा असून,दरवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून मेघनाथ जत्रा (गरदेव)उत्सव साजरा केला जातो.पुरातन लोककला आणि सांस्कृतिक व पारंपरिक परंपरेला जोपासणारा मेघनाथ जत्रा लोकोत्सव दरवर्षी साजरा करण्याची कोंढाळा गाववासीयांची ऐतिहासिक परंपरा असून आज,शुक्रवारी १४ मार्चला मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात येत आहे.गावातील सर्व नागरिक गरदेव पूजन परिसरात मोठ्या आस्थेने गरदेवाचे पूजन करून सर्वांच्या कल्याणासाठी भक्तिभावाने मनोकामना करतात.होळीचा सण असल्याने परिसरात गाठ्याच्या दुकानांची रेलचेल असते.होळीच्या सणाची चाहूल लागून होळी सणानिमित्त गरदेव यात्रेचा शुभारंभ होतो.त्यामुळे गावात एकीकडे रंगांची उधळण,तर दुसरीकडे गरदेव पूजेचे चैतन्यमय वातावरण बघण्यासाठी परिसरातील गावातील नागरिकांना गरदेव उत्सवाची ओढ लागते.पुरातन काळापासून गरदेव पूजनाचा उत्सव करण्याची परंपरा बुराडे परिवाराने जपून ठेवली आहे.गरदेव उत्सवात आलेल्यांसाठी मनोरंजन आणि समाज प्रबोधनासाठी आज नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी यात्रेदरम्यान गरदेवाची पूजा केली जाते.स्थानिक बुराडे परिवार व गावकरी मिळून यात्रेला आलेल्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात.गरदेव यात्रेचा इतिहास सुमारे दीडशे वर्षे जुना आहे.
- Advertisement -