Saturday, October 10, 2026
Homeनागपूरकॅच-कॅच नामक ॲपवर सुरू झालेली चॅटिंग पोलिसांत पोहचली..! - विवाहित पुरुषाचा घटस्फोटित...

कॅच-कॅच नामक ॲपवर सुरू झालेली चॅटिंग पोलिसांत पोहचली..! – विवाहित पुरुषाचा घटस्फोटित महिलेवर अत्याचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पहिल्या पतीशी नाते संबंध तोडत असतांनाच एका विवाहित पुरुषाशी न्यायालयाच्या आवारात ओळख झाली.ओळखीचे रूपांतर कॅच-कॅच नामक ॲप व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपसात चॅटिंग सुरू झाले. यातून दोघांत भेटी-गाठी सुरू झाल्या.त्याने लग्न करण्याची बतावणी करीत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून गर्भधारणा झाल्याचे तिच्या लक्षात येताच तिने लग्नासाठी तगादा लावला असता, त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.अखेर कॅच-कॅच नामक ॲपवर सुरू झालेली चॅटिंग पोलिसांत पोहचली
आणि पोलिसांनी त्याला सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टाकळी(भन्साळी)येथून नुकतीच अटक केली.३७ वर्षीय उमेश गोपाल कुर्रे रा.वॉर्ड क्रमांक-२, टाकळी भन्साळी,ता.सावनेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पीडित महिला घटस्फोटित असून,ती आई,वडील,भाऊ,वहिनी व तिच्या आठ वर्षीय मुलीसोबत वैशालीनगर,हिंगणा रोड,नागपूर येथे राहते. तिचा ऑगस्ट २०२५ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर ती उपजीविका करण्यासाठी काजू कतली तयार करण्याचे काम करते.उमेश व तिची पहिली भेट ७ जुलै २०२५ रोजी नागपूर शहरातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात झाली होती.त्यावेळी ती तिच्या प्रकरणाच्या शेवटच्या पेशीवर तर उमेश काही कामानिमित्त एमएस-२७ बीई-३३७४ क्रमांकाच्या टाटा सफारीने न्यायालयात गेला होता.याच ठिकाणी त्यांची पहिली भेट झाली.त्यानंतर त्यांचे कॅच-कॅच नामक ॲप व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपसात चॅटिंग सुरू झाले.मध्यंतरी ती उमेशसोबत त्याच्या टाटा सफारीमध्ये पारशिवणी तालुक्याच्या
कुवारा भिवसेन परिसरात फिरायला गेली.उलट्या झाल्याने उमेशने तिला पारशिवणी शहरातील डॉक्टराकडे नेऊन औषधोपचार करवून घेतले.तिथून त्याने तिला मनसर-रामटेक मार्गालगतच्या एका ओयो हॉटेलमध्ये नेले आणि तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.त्यानंतर त्याने लग्न करण्याची बतावणी करीत १६ जुलै २०२५ रोजी सावनेर तालुक्याच्या पाटणसावंगी शिवारातील गोजी हट हॉटेलमध्ये,पुढे काटोल नाका परिसरातील हॉटेल ग्रँड त्रिनिटी व नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले.यातून तिला गर्भधारणा झाली.तिने २९ ऑगस्ट २०२५ रोजी त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. त्यावेळी त्याने वाडी परिसरात वाहनातच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. ६ सप्टेंबर २०२५ रोजी वैद्यकीय तपासणीनंतर ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.याची माहिती तिने उमेशला देताच त्याने लग्नाचा विषय टाळायला सुरुवात केली.त्यानंतर तिचा नैसर्गिकरीत्या गर्भपात झाला व उमेशला कळविले.१५ ऑक्टोंबर २०२५ रोजी तिने पाटणसावंगी परिसरात त्याची भेट घेतली. त्यावेळी त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवाय,तो विवाहित असून,त्याला दोन अपत्ये असल्याचेही तिला कळले आणि पायाखालची जमीनच सरकली.आपली फसगत झाल्याचे पीडितेच्या लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहूरगडच्या श्री रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्यासाठी चोपचे भक्त रवाना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता शक्तिपीठ,माहूरगड येथून पवित्र दिव्य ज्योत आणण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ,चोपचे भक्त आज,शनिवार १० ऑक्टोंबरला रवाना झाले.गेल्या...

आगामी काळात अन्न धान्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा महाराष्ट्र राज्यात पड़लेल्या भीषण दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतातील उभी पिके उद्धवस्त झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात...

तब्बल १२ लाखांहून अधिक हिवताप चाचण्या; हिवतापाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे...

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!