Friday, October 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तफटाके फोडतांना काळजी घ्या; फटाक्यातील पावडर पेटवताच चेहरा भाजून दृष्टी गमावण्याची वेळ..

फटाके फोडतांना काळजी घ्या; फटाक्यातील पावडर पेटवताच चेहरा भाजून दृष्टी गमावण्याची वेळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिवाळीचा उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.विशेषतः लहानांपासून ते थोरांपर्यंत अनेकजण दिवाळी निमित्त फटाके फोडून सणाच्या उत्साहात भर घालतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे बीड शहरातील एका आठ वर्षीय मुलाने काल सोमवारी सकाळच्या सुमारास फटाके फोडण्याचा प्रयत्न केला.फटाके फोडत असतांना काही फटाके फुटले नसल्याने त्याने फटाके छिलून त्यातील पावडर एका कागदावर गोळा केली.पावडर कागदावर गोळा करून पेटवताच पावडरचा अचानकपणे मोठा भपका उडाला.यात आठ वर्षीय राजेश राजेंद्र शिकलकरी रा.नागोबा गल्ली,ता.जि.बीड याचा चेहरा भाजून डोळ्यास गंभीर इजा झाली आहे.त्यामुळे दृष्टी गमावण्याची वेळ चिमुकल्यावर आली आहे. चिमुकल्याचा डोळ्याच्या बाहुली जवळील भागाला मोठी जखम झाल्याने त्याच्यावर दृष्टी गमावण्याची वेळ आली आहे.त्यामुळे फटाके फोडतांना काळजी घ्या,विशेषतः पालकांनी लहान मुलांवर लक्ष ठेवावे. जेणेकरून एखादा अनुचित प्रकार घडू नये.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!