Thursday, January 22, 2026
Homeदेसाईगंजकृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे माजी आमदार कृष्णा गजबेंना साकडे..

कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे माजी आमदार कृष्णा गजबेंना साकडे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-ऐन शेतीचा उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून देसाईगंज तालुक्यातील इतर गावांसह कुरुड,कोंढाळा येथील वीज पुरवठा होणाऱ्या फिडरच्या कृषी वाहिन्यांना कमी दाब येत असल्याने कृषी पंप सुरळीत न चालता शेतातील धान पिकांना पाहिजे त्या प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही.त्यामुळे धानपिक करपण्याच्या स्थितीत आले असल्याने शेतकऱ्यांनी कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठ्यासाठी माजी आमदार कृष्णा गजबे यांचेकडे नुकतेच साकडे घालून निवेदन सादर केले आहे.प्रसंगी भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी गजबे यांना साकडे घालून कृषी पंपांच्या वीज पुरवठ्याबाबत कैफियत मांडली असता,लगेच तात्काळ माजी आमदार कृष्णा गजबे यांनी सर्वप्रथम देसाईगंज विद्युत वितरण कार्यालयाचे उपविभागिय अभियंता निखार यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली.निखार यांनी ब्रम्हपुरीच्या सबस्टेशन या ठिकाणाहूनच कमी दाबाचा पुरवठा होत असल्याचे सांगितले.त्यामुळे चंद्रपूरचे मेंटेनन्स अधिकारी
गजबे व कार्यकारी अभियंता गाडेवार यांच्याशी संपर्क साधून गजबे यांनी समस्या जाणून घेतल्या.त्यानुसार तात्काळ दाब कसा वाढेल आणि लवकरात लवकर या भागातील कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा कसा करता येईल,याबाबत समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.ऐन शेतीच्या हंगामातील शेवटच्या टप्प्यातच  शेतकऱ्यांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांना निवेदन सादर केले.निवेदन सादर करतेवेळी शेतकरी दौलत ठाकरे,अरुण राऊत,सुशील ढोरे,विकास पारधी, अमित व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!