Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी कुरखेडाच्या देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी १७ जणांविरोधात...

मोठी बातमी कुरखेडाच्या देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुका अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव खरेदी केंद्रात उघडकीस आलेल्या धान अपहार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगाव येथे पणन हंगाम २०२३-२४ व हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्यात आला होता.परंतु साठा पुस्तकानुसार व प्रत्यक्ष शिल्लक धान यात प्रथम दर्शनी तफावत आढळल्यामुळे शिल्लक धानाची मोजणी व्यवस्थापकीय संचालक नाशिक यांच्या आदेशानुसार करण्यात आली.त्या मोजणीत दोन्ही हंगामात १०,०८४.०८ क्विंटल धान कमी आढळून आला. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे सचिव,संचालक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १७ जणांविरुद्ध काल,शुक्रवार १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन कुरखेडा येथे प्रथम खबर क्रमांक-६९ अन्वये नोंदविण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश👇
देऊळगाव खरेदी केंद्रात मोठ्या प्रमाणावर धान अपहार झाल्याची बाब भेटीदरम्यान निदर्शनास आली  होती.माध्यमातून यावर आक्षेपण देण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी देखील आरोपींवर कारवाईचे निर्देश दिले होते. आरोपींमध्ये संस्थेचे सचिव,संचालक मंडळातील सदस्य तसेच काही कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश असल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संभारे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!