Monday, September 21, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा आम आदमी पक्षाच्या वतीने भव्य चक्का जाम आंदोलन- उद्योगा प्रमाणे शेतीलाही...

कुरखेडा आम आदमी पक्षाच्या वतीने भव्य चक्का जाम आंदोलन- उद्योगा प्रमाणे शेतीलाही २४ तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा :- शेतकरी बांधवांच्या शेतीला उद्योगांप्रमाणेच २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा; या मागणीसाठी काल १५ मार्च २०२३ ला कुरखेडा आम आदमी पक्षाचा भव्य चक्का जाम आंदोलन गेवर्धा-गुरनोली फाट्यावर शांततेत करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने उद्योगांप्रमाणे शेतीलाही २४ तास अखंडित वीज पुरवठा करावा व शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठ्यापासून मुक्त करावे.या मागणीसाठी आम आदमी पार्टी कुरखेडा च्या वतीने गेवर्धा-गुरनोली फाट्यावर भव्य चक्काजाम आंदोलन शेकडो शेतकऱ्यांच्या व आप कार्यकर्ते सहभागी होऊन कुरखेडा वडसा रस्त्यावर बसून जवळपास २ तास चक्काजाम आंदोलन शांततेत करण्यात आला.

शेती पंपा करिता दिला जाणारा ८ तासाचा विद्युत पुरवठा वाढवून १६ तास करावे.अन्यथा आम आदमी पार्टी  शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यांवर उत्तीरून तीव्र आंदोलन करेल; अशा प्रकारचे निवेदन सादर करून शासनास इशारा दिला होता.निवेदन सादर करुनही शासन स्तरावरून कोणत्याही प्रकारचे पाऊल शेतकऱ्यांच्या हितासाठी उचलण्यात न आल्याने आम आदमी पक्ष कुरखेडाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करण्यात आले.

कूरखेडा तालुक्यात दिला जाणार कृषी विद्युत पुरवठा केवळ आठ तास दिला जात आहे.यामुळे उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची शेत पिके करपण्याच्या  स्थितीवर आहेत.सदर ८ तासाचा विद्युत पुरवठा १६ तास न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला समोर जावे लागणार आहे.यापूर्वी १२ तास विद्युत पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले.परंतु मागील एक महिन्यांपासून कृषी जोडणी असलेल्या विद्युत पंपांना केवळ ८ तास वीज मिळत असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपण्याची स्थितीत आले असून या विषयावर तात्काळ निर्णय घेऊन सदर वीज पुरवठा १६ तास न केल्यास शेतकरी पीक हातातून निघून जाईल यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.उद्योग नसलेल्या जिल्हा व मागासलेली स्थिती असलेल्या या भागात शेती हे एकमेव रोजगाराचे साधन आहे.त्यातच वीजपुरवठा केवळ ८ तास झाल्यास शेती कशी पिकवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा येऊन ठाकला आहे.

सदर अन्यायपूर्ण बाबीचा पुनर्विचार करावा व शेती करिता किमान १६ तास तरी वीज पुरवठा करण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा.आंदोलन स्थळी महावितरण कुरखेडा येथील उपविभागीय अभियंता मुरकुटे यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी भेट घेऊन चर्चा केली.जिल्हा प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार अनमदवार यांनी जबाबदारी पार पडली.पोलिस विभागाने आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता.ठाणेदार पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांनी स्वतः आंदोलन स्थळी उपस्थित राहून सहकार्य केले.

सदर आंदोलनात बालकृष्ण सावसागडे जिल्हाध्यक्ष,भास्कर इंगळे जिल्हा सचिव,प्रकाश जीवानी जिल्हा उपाध्यक्ष,कुरखेडा ईश्वर ठाकूर तालुका संयोजक,ताहीर शेख तालुका सचिव,अनिकेत आकरे सह संयोजक,हिरा चौधरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य, दीपक धारगाये सह संयोजक,पंकज डोंगरे सह संयोजक,अतूल सिंद्राम युवा सह सचिव,मुकेश नरोटे कोरची तालुकाध्यक्ष,भरत दहलानी तालुका संयोजक, आशिष गुटके वडसा शहराध्यक्ष,अमोल धाबेकर, गोकुळ यावरकर, तोहसीफ शेख,प्रकाश रक्षे,निलेश बसोना,चंद्रकिशोर बलोरे,विलास तीर्गम,सचिन मेश्राम, प्रदीप जनबंधू, दिलीप कुमोटी,रवींद्र मडावी,जगदीश रक्से, भास्कर मडावी कुमार नागदेवे, विनोद मेश्राम ,इसाक शेख,आशु राऊत,तबरेज खान,दीपक नागदेवे ,अतुल ठाकरे,चंदू ठाकरे,पवन तुमवार,नाजूक लुटे,सौरभ साखरे, शेखर बारापात्रे,शिल्पा बोरकर, सिद्धार्थ गणवीर,वामन पगारे,परवेज पठाण,प्रमोद दहिवले,आशिष कोवे, धम्मदीप राऊत, योगराज धमगाये,बाबुराव मडावी ,हिरा भाऊ उईके,विलास चव्हाण, युवराज साडील, परिसरातील शेतकरी सुनील किन्नाके जावेद शेख,जीवन पर्वते,स्वप्निल नागापुरे ,विकास पर्वते ,योगेश नखाते ,नामदेव नखाते ,बाळकृष्ण नखाते,वासुदेव बहेटवार,अनिल मचिरके, सुखदेव बुध्द,सोक सुखारे,दीपक सय्याम,भावेश कांबळे,दामोदर बाराई,रोशन टेभूर्ने,रोशन सय्यद, दिलीप कांबळे आदी मोठ्या संख्येने आप कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!