Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारकांना मिळणार १२ तास वीज पुरवठा - उद्योग,ऊर्जा व कामगार...

गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंप धारकांना मिळणार १२ तास वीज पुरवठा – उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने दिले निर्देश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातील कृषी पंप धारक शेतकरी बांधवांना केवळ ८ तास विद्युत पुरवठा केला जात असल्याने विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आवाज उठवून रस्ता रोको आंदोलन,चक्का जाम आंदोलन, कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांना घेराव घालून आंदोलन व इतर आंदोलने करून विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनीला वेठीस धरून किमान १२ तास शेतकरी बांधवांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात यावा; अशी मागणी यापूर्वीही व हल्ली करण्यात येत आहे.

विविध संघटनांनी केलेल्या मागणीनुसार, महावितरणने ३ मार्च २०२३ रोजी उद्योग,ऊर्जा व कामगार विभागास पत्रव्यवहार करून २४ तास वीज पुरवठ्याची मागणी केली होती.त्यानुसार उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने काल १५ मार्च २०२३ रोजी उप सचिव यांच्या सहिनिशी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,महावितरण कंपनी मर्या.प्रकाशगड,वांद्रे (पूर्व),मुंबई -५१ यांना निर्देश देऊन आरमोरी,जिल्हा गडचिरोली मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामधील कृषीपंपाना दिवसा १२ तास वीजपुरवठा देण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.

उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने दिलेल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की,गडचिरोली जिल्ह्यामध्ये कृषीपंपांना ही कार्यवाही सुरू केल्यापासून पुढील दोन महिने दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा देण्याबाबत संबंधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देवून त्याची अंमलबजावणी सुरु करावी व या संबंधी केलेल्या कार्यवाहीची माहिती शासनास सादर करावी.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!