- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या सती नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याने मुख्य मार्ग बंद आहे.परिणामी, नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून हलक्या वाहनांसाठी कुरखेडा-आंधळी फाटा-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्गे प्रवास करावा लागत आहे.अश्यातच पर्यायी मार्गाचीही पुरती वाट लागून भले मोठे खाचखड्डे,दलदल व ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ असे झाल्याने मार्गावरून आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्याबाबत रोष व्यक्त करत सदरचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत आहे.पावसाळ्यात वाहने घसरून अपघात होत आहेत. लहान मुले शाळेत जातांना पडतात.त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती.सदर बाबीची गंभीर दखल घेत आज,बुधवार १० सप्टेंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आंधळी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय हायवे विभाग,लघु पाटबंधारे विभाग यांचेसह पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना तात्काळ मार्गावर उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले.लगेच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली असता आमदार मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारास सांगितले की, “नागरिकांचा रोजचा प्रवास या मार्गावरून होत आहे. रुग्णवाहिका,शालेय विद्यार्थी,वाहतूक,शेतकरी,व्यापारी वर्ग यांचेसह सर्वसामान्य जनतेसाठी हा मार्ग सुकर आणि सुरक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे; यासाठी दोन दिवसांच्या आत या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, असे निर्देश दिले.प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात-लवकर मार्ग सुकर करण्यात येणार असल्याचे आमदार मसराम यांना सांगितले.
- Advertisement -

