Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंजकुणी मुलीच्या १८ वर्षासाठी १ दिवसाची वाट पाहात असतात….-प्रेमविवाहाने आई वडिल व...

कुणी मुलीच्या १८ वर्षासाठी १ दिवसाची वाट पाहात असतात….-प्रेमविवाहाने आई वडिल व मुलात होते दुरावा-  ह.भ.प. शंकर कावळे महाराज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :-विवाह हा माणसाला मिळालेला सर्वात गोड,सर्वात रोमांचकारी आणि समाधानकारक अनुभव आहे.आयुष्यभर आपल्या साथीदारांच्या सुख -दुःखामध्ये साथ देणे,गोड-कडू अनुभवातून एक दाम्पत्य म्हणून काहीतरी नवीन शिकणे आणि शेवटच्या क्षणी या सर्व गोष्टीचा विचार करून समाधान मानने यापेक्षा वेगळी गोष्ट अनुभव काय असू शकतो? विवाह ही एक महत्त्वाची सामाजिक परंपरा आहे. प्रत्येक व्यक्तीस एक परिपूर्ण साथीदार हवा असतो प्रेम विवाहात व्यक्ती स्वतःहून जीवनसाथीदाराची निवड करतात.तर ठरवून केलेला विवाह अरेंज मॅरेज झाल्यास जीवनातील साथीदार हे पालक अथवा नातेवाईक निवडतात.आपल्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी जोडीदार शोधत असताना पालक संभावे वधू किंवा वर यांचे कुटुंब यांच्यासाठी सुसंगत आहेत की नाही हे प्रथम तपासतात.परंतु आता काळ बदललेला आहे.समाजाचे विचार आणि आचार बदललेले आहेत.परंतु प्रेम विवाह करत असतांना; कोर्टामध्ये रजिस्ट्री मॅरेज करत असतांना वर आणि वधू (मुलाआणि मुलींकडे) आई-वडिलांची सुद्धा संमती घेणे आवश्यक आहे.त्यांच्या उपस्थितीत सही शिवाय कोणत्याही प्रेमविवाहाला मंजुरी देऊ नये; असा कायद्या सरकारनी करावा; असे आवाहन चोप येथिल भागवत सप्ताहच्या शेवटच्या सत्रात ह.भ.प.शंकर कावळे महाराज यांनी आपल्या वाणीतून केले आहे.दत्त सेवा समिती व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या सयुक्त विध्यमानने भागवत सप्ताहचे शेवटच्या सत्रात बोलत होते.

लग्न म्हणजे केवळ दोन लोकांचे एकत्रिकरण नसून दोन कुटुंबांमध्ये एकत्र येणे; दोन सोशल नेटवर्क त्यांचा आता पूर्वीपेक्षा जास्त संबंध आहे. सुव्यवस्थित विवाह या कौटुंबिक मिलनवर एकत्रित आहे.प्रेमविवाहात त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीविषयी आधीपासूनच माहिती असतात.आपल्याला त्या व्यक्तीमध्ये असलेले चांगले गुण आणि वाईट गुण तसेच त्या व्यक्तीचे वर्तन माहीत असते.लव मॅरेजमध्ये सहसा कुटुंब सामील नसतात. कारण सामान्यता मुलगी किंवा मुलगा आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करतात बऱ्याच वेळा त्याचे कुटुंब समर्थन देत नाहीत.आणि आपल्या मुलांच्या निर्णयांमध्ये सामील होत नाही.प्रेम विवाह सामाजिक दृष्ट्या अस्विकार्य आहे.असे काही लोकांमध्ये मानतात की,प्रेमविवाह करणे खूप धोकादायक आहे.आजची तरुण पिढी आकर्षण आणि प्रेम या दोन्ही संकल्पनेमध्ये गोंधतात.जीवनात आपल्याला फक्त प्रेम पाहिजेत असे नाही.कौटुंबिक पार्श्वभूमी आर्थिक परिस्थिती ते ज्या वातावरणात वाढले होते इत्यादी वास्तव्य देखील पाहिले पाहिजे.प्रत्येकाच्या आयुष्यात निश्चितपणे एकजिवनसाथी आवश्यक आहे.कोणतेही दोन माणसे कधीही परिपूर्ण समान विचाराचे असू शकत नाहीत.कारण प्रत्येक व्यक्तीच्या वृत्ती विचार प्रक्रिया गुणधर्म आणि वागण्यात वैविध्यपूर्णता असतात.एखादी व्यक्ती अशी अपेक्षा करू शकतात की तो-ती जसा आहे.तसाच दुसरा त्यांचा जीवनसाथी असेल म्हणजे लग्नानंतर तडजोड ही करावी लागतील.बहुतांसे प्रेमविवाह जोडप्यांचा लग्नानंतरचा उत्साहात पूर्णतः संपून जातो मग प्रेमाची जागा वादविवाद घेतात.दोघांची ऐकूण घेण्याची तयारी नसते भांडणे विकोपाला जातात आणि मग भविष्य व मुलांचा विचार न करता जोडपी घटस्फोटासाठी न्यायालयात जातात.ठरवुन केलेल्या विवाहाला ज्या प्रकाराच्या सामाजिक पाठिंबा मिळतो त्या प्रकाराचा पाठिंबा प्रेमविवहाला मिळत नाही.त्यामुळे येणाऱ्या प्रसंगाला जोडप्याला स्वतः सामोरे जावे लागते त्यामुळे जर जुळवून घेण्याची क्षमता नसेल तर या नात्याला तळा जाऊ शकतो असे दिसून येते.खरंतर पालक इतर ठिकाणी आपल्या मुलांना त्यांची स्पेस देतात मग मुलांनी प्रेम विवाह करायचा ठरवला की असे काय जादूची कांडी फिरते की नेहमी पालक एकदम टोकाची भूमिका घेऊ शकतात हे सुद्धा खरे आहे पन …खरच प्रेम अधांळ  आहे.असे मानतात

 प्रेम असं नसतं प्रेमवीर प्रेम करीत प्रेम विवाह करीत असताना आपल्या आई-वडीलांची सामाजिक व मानसिक स्थिती खराब करतात.आपल्या पूर्वजांची आई वडिलांची समाजात काय प्रतिष्ठा आहे. त्यांचासुद्धा भान राखावा.प्रेमविवाहाणे आई-वडिलांवर व मानसिक व शारीरिक परिणाम होत असून त्यातून आपला जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करीत असतात.अपत्य प्राप्तीसाठी आई-वडील किती धडपड करत असतात.जीवाचा रान करून जीवाचा आटापिटा करून कुणाला लग्नानंतर पाच -पाच वर्षे तर कुणाला १५-१८ वर्षे अपत्य प्राप्ती होत नसते . त्यामुळे तेव्हा आई-वडील चे दशा आणि दिशा काय असते.अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर सामाजिक दृष्ट्या व भावनिक दृष्ट्या ते किती  परिपूर्ण होती का नाही? उतावीळ  मनातील मूले तारुण्याच्या जोशात कुणि १८ वर्ष पुर्ण होण्याची वाट पाहात असतात.समाजात आताही काही ठिकाणी बाल विवाहाचा कायदा असुनही बालविवाह करित असतात.तर कुणी मुलीची १८ वर्ष १ दिवसाची वाट पाहात असतात.प्रेमविवाहात गरिब आणि श्रीमंत हा विचार नसुन सामाजिकदृस्टा चांगला विचार यातुन गेला पाहिजे. सामाजिक,आर्थिक,मानसिक दृष्ट्या परिपूर्ण होत नसून प्रेमाचा विरहात ते कृत्य करीत असते आणि समोर जाऊन ती पश्याताप करत असते.तेव्हा आई-वडील जवळ घेत नाहीत.प्रेमवीरहात नाते दुरावतात हे आपले मूल नाही.आपला समाजात मान काय त्यातून ती जीवन संपवण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असतात. नर्सरी ते  पदवी पर्यंतचा व त्यानंतरचा खर्च आई-वडिलांचा खूप मोठ्या प्रमाणात होतो.ही गोष्ट मुलाला समजते का? राब-राब शेतात व इतर ठिकाणी राबुन  मुलीला लहानाचा मोठा करुन शिकवित असतात. आपल्या डोळात पानी आणणार पन आपल्या अपत्याच्या डोळात पानी येऊ देत नाही.आपल्या अंगावार कपडे फटाके फूटके लाऊन मुलाला चांगले कपडे घेउन देतात.हे सर्व फक्त आई- वडिलांना माहित असते.जीवनातत मुलांना आकार व संस्कार देऊन, वाईट विचाराच्या मागे जाऊन मुले प्रेम विवाह करतात.परंतु मुलगी त्याचा विचार न करता प्रेमाच्या विरहात आई वडिलांलंचि पर्वा न करता प्रेमवीवाह करित असतात.मुलगी आई-वडिलांचा मान सन्मान खाली पाळतो.महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा असून महाराष्ट्राला धार्मिक,सांकृतिक,सामाजिक,परंपरा लाभलेली असून संतांची भूमी आहे.देशात महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे.त्यामुळे राज्यात नोंदणी प्रेमविवाहच्या वेळेस आई-वडिलांची पूर्व संमाती घेण्यात यावी; यासाठी लोकप्रतिनिधी यांनी सदर बाब लक्षात घेउन सरकारमध्ये कायदा करावा; असे ह.भ.प.शंकर कावळे महाराज यांनी आपल्या वाणीतून संदेश दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!