Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकाही काळासाठी थंडी सुट्टीवर..!

काही काळासाठी थंडी सुट्टीवर..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सुरू असलेल्या नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात कडाक्याच्या थंडीने सर्वत्र हुळहुळी भरून तापमानाचा नीचांकी आकडा ६ ते ७ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.अश्यातच आता दोन दिवसांपासून नीचांकी तापमान १० अंश सेल्सिअसवर पोहचल्याने महाराष्ट्र राज्यात थंडीचा गारठा कमी राहणार असून पुढील २४ तासांमध्ये थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे.दुपारच्या वेळी उष्मा अधिक जाणवेल,तर राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये उष्णतेचे प्रमाण अधिक जाणवेल व हवा दमट असेल.अचानक होणाऱ्या या बदलांचे परिणाम थेट आरोग्यावर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. अचानक होणाऱ्या बदलांमुळे सर्दी,खोकला तसेच उष्माघातासारखी स्थिती उदभवण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये असणारा शीतलहरींचा प्रभाव कमी झाला असून,मैदानी क्षेत्रांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे.तर, पर्वतीय भागांवरही हिमवर्षावाने विश्रांती घेतल्याने थंडी काही काळासाठी सुट्टीवर गेल्याचे चित्र आहे.
हवामानाच्या या बदलांचा परिणाम महाराष्ट्रावरही  होतांना दिसून येत आहे.राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होतांना दिसत आहे.देशभरात सध्या धुके आणि धुरक्याचे प्रमाण अधिक असून दृश्यमानतेवर त्याचा थेट परिणाम होतांना दिसत आहे. तर,दक्षिण भारतामध्ये पावसाचीच हजेरी कायम असल्याने तापमानात बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या हवा कोरडी राहणार असून उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने  थंडीचा कडाका कमी झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!