Saturday, March 15, 2025
Homeगोंदियाकाळ्या बिबट्याची शिकार; पाच आरोपींना धुलाई
spot_img

काळ्या बिबट्याची शिकार; पाच आरोपींना धुलाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया : महाराष्ट्रात काळय़ा बिबटय़ाचे अस्तित्व दुर्मिळ असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील काळ्या बिबट्याची शिकार १३ जानेवारी २३ रोजी केल्याची कबुली मंगेफरी येथे अटक केलेल्या पाच आरोपींनी दिली आहे.               आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे काळ्या बिबटाचे अर्धवट जळालेले हृदय वनविभागाने जप्त केल्याची माहिती नागझिरा नवेगावबांध व्याघ्रप्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी प्रदिप पाटील यांनी दिली आहे.

गोंदिया जिल्ह्यात वन्यप्राण्याचे अवयवांची तस्करी व विक्री होणार असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी यांना मिळाली होती. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व पोलिस विभाग, गोंदिया यांच्या एक महिन्याच्या प्रयत्नानंतर पाच आरोपींना पकडण्यात आले.२६ फेब्रुवारी रोजी आरोपी शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, माणीक दारसू ताराम, अशोक गोटे, सर्व रा. मंगेझरी, पो. मुरदोली, ता. देवरी व रविंद्र लक्ष्मण बोडगेवार, रा.पालांदूर, ता. देवरी या आरोपींनी मंगेफरी येथे १३ जानेवारी रोजी काळ्या बिबटला फासात अडकवून त्याची शिकार केली. त्या पाचही आरोपींकडून केलेला गुन्हा वदवून टाकला. ही कारवाई नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयरामेगौडा आर., पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर, विभागीय वन अधिकारी प्रदिप पाटील, देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगाव वन्यजीव अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक रोशन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, संरक्षण पथक संजय मेंढे, पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, चिचगडचे ठाणेदार शरद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मुरूडकर, नरेंद्र सावंत यांनी केली आहे.

साहित्य केले जप्त👇

वाघ किंवा बिबट या मांजर कुळातील वन्यप्राण्याचे दात २, नख १, अस्वलाचे नखे ३, रानडुक्कर सुळे १०, चितळाचे शिंग १, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजराचे खवले २, ताराचे फासे, जिवंत मोर १, मोराचे पिस ५ बंडल, रानगव्याचे शिंग १, जाळे, सुकलेले हाडे, रक्त पापडी (झाडाची साल), सुकवलेले मास, देशी दारु पेटी अंदाजे किंमत ८४ हजार रुपये, रोख रक्कम २१ लाख ४९ हजार ४४० रुपये जप्त करण्यात आले.

व्हीडीओ झाली होती व्हायरल पण वेळीच दाबली

काळ्या बिबट फासात अडकल्याची व्हिडीओ १४ जानेवारीला व्हायरल झाली होती.काही लोकांपर्यंत पोहचल्याने वनविभागाने वेळीच या प्रकरणाला वर येऊ दिले नाही.परिणामी ते प्रकरण तिथेच थांबले.परंतु आता अटक झालेल्या आरोपींनी या काळ्या बिबटाच्या शिकारीची कबुली दिल्याने ती व्हिडीओ सत्य असल्याचे वनाधिकारी सांगतात.

कॅमेऱ्यात झाला होता बिबट कैद

नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहेत.ब्लॅक लेपर्ड हा आपल्या सोबत्यासह नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह (एनएनटीआर) अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले आहे. या कॅमेऱ्यात झालेल्या नोंदी डब्ल्यूआयआयकडे व भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविल्या जातात. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!