Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात ६ मार्च ला लोकशाही दिनाचे आयोजन- तक्रार,निवेदने वैयक्तिक स्वरुपाची...

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात ६ मार्च ला लोकशाही दिनाचे आयोजन- तक्रार,निवेदने वैयक्तिक स्वरुपाची असावी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- सर्व जनतेस सुचित करण्यात आले आहे की,जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथील सभागृहात सोमवार ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी २ ते ३ वाजे पर्यंत राहील आणि सभेला ३ वाजता सुरुवात होणार असल्याने ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास,त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होऊन प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर ६ मार्च रोजी होणाऱ्या लोकशाही दिनी तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-१ अ ते १ ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहिल.तसेच तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी.अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही.तसेच ६ मार्च रोजी व्हिडीओ कॉन्फन्सद्वारे प्राप्त निर्देशान्वये विशेष कार्यकारी अधिकारी,मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, गडचिरोली येथे प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर जलद गतीने निराकरण करण्याच्या दृष्टीने सर्व प्राप्त तक्रारीबाबत संबंधित कार्यालय प्रमुखाकडुन आढावा  घेण्यात येणार आहे.असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!