उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरची येथील विविध व्यवसायाची कालबाह्य झालेली निर्लेखित यंत्रसामुग्री व साहित्ये व उपकरणांची ६ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
इच्छूक निर्लेखित यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होणेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरची जि.गडचिरोली येथे त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत अभिलेख्यासह उपस्थित राहवे. किमान तीन खरेदीदारक उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार नाही.लिलावाच्या अटी व विक्री करावयाचे साहित्य संस्थेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध असणार असल्याने लिलाव प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.