Saturday, September 26, 2026
Homeभंडाराकामबंद आंदोलनामुळे गावगाडा पडला ठप्प; ५४१ ग्रामपंचायती झाल्या कुलूपबंद...!

कामबंद आंदोलनामुळे गावगाडा पडला ठप्प; ५४१ ग्रामपंचायती झाल्या कुलूपबंद…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ग्रामविकास आणि ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण यासाठी विविध मागण्यांना घेऊन शुक्रवार,१६ ऑगस्टपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे.या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील १०० टक्के ग्रामपंचायती कुलूपबंद झाल्या आहेत. त्यामुळे कामकाज ठप्प पडले.दरम्यान,ग्रामपंचायतींचे अधिकार हनन करणाऱ्या शासन निर्णयाचा सरपंच, उपसरपंच यांनी निषेध केला.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये शेकडो सरपंचांनी शुक्रवारी एकत्रित येऊन बीडीओंना कामबंद आंदोलन सुरू केल्याचे निवेदनातून अवगत केले आहे.सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्रामसेवक,रोजगार सेवक,संगणक परिचालक,ग्रामपंचायत कर्मचारी अशा ग्रामपंचायतशी निगडित सर्वच संघटनांचा पाठिंबा असल्याने गावगाडा ठप्प पडला असून शासनाच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम पडला आहे.
मागण्या निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याने कामाचा खोळंबा होणार आहे.यात मात्र जनसामान्यांची कामे प्रामुख्याने रखडणार आहेत.
प्रमुख मागण्या…👇
१.प्रधानमंत्री आवास योजनेची ‘ड’ यादी तात्काळ मंजूर
करण्यात यावी.
२.मोदी आवास योजनेचे पैसे तात्काळ मिळण्यात यावे.उर्वरित लाभार्थीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी.
३.यशवंतराव चव्हाण,रमाई,शबरी या योजनेच्या मंजूर असलेल्या घरकुलांना पैसे तात्काळ देण्यात यावे.
४.यशवंतराव चव्हाण,अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेच्या नवीन प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात यावी.
५.शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना ३ लाख रुपये निधी देण्यात यावा.
६.रोजगार हमी योजनेचे कुशल,अकुशल कामाचे पैसे तात्काळ देण्यात यावे.
७.उच्च न्यायालयाने रद्द केलेले २५ लाखांपर्यंतचे काम करण्याचे ग्रामपंचायतीचे अधिकार याबाबत शासनाने सुप्रीम कोर्टातून ‘स्टे’आणावे.
८.सरपंच,उपसरपंच,सदस्य यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात यावे.
९.ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण क्षेत्र वाढवण्यात यावे.
अशा विविध मागण्यांना घेऊन राज्यव्यापी कामबंद आंदोलन प्रारंभ करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!