Monday, September 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता घरबसल्या करा आधार क्रमांक बँक खात्याला लिंक... - बँक खाते आधार...

आता घरबसल्या करा आधार क्रमांक बँक खात्याला लिंक… – बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही? हेही तपासा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत.एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत.अजूनही रोज अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करीत आहेत.मात्र, बँक खात्याशी आधार नंबर लिंक असेल तरच महिलांना या योजनेचे पैसे मिळत आहेत.आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण २७ लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत.याच पार्श्वभूमीवर घरबसल्या आधार क्रमांक बँक खात्याला कसे लिंक करायचे? हे जाणून घेऊ या…
सर्वांत अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही? हे कसे तपासावे ते पाहुया.हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या https://uidai.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.
१. त्यासाठी गुगल वरती सर्च करा My Adhar
२. आता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट आली असेल त्यावर क्लिक करा.
३. आता तुम्हाला तुमचा आधार नंबरने लॉगिन करायचे आहे. त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा भरावा लागेल.
४. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो टाका.
५. ओटीपी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉगिन झाले आहात.
६. आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल.
७. आता तुम्हाला खाली Bank seeding status हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा.
८. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर,तुमच्या बँकेचे नाव,आणि तुमचा खाते ॲक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल.
आता आपण बँकेला आधार क्रमांक कसा लिंक करायचा ते समजून घेऊया ?👇
१. सर्वात आधी तुम्हाला गुगल NPCI असे सर्च करायचे आहे.
२. त्यानंतर खाली सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला NPCI चे अधिकृत संकेतस्थळ दिसेल,त्यावर क्लिक करा.
३. आता तुम्हाला consumer या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
४. त्यानंतर Bharat Aadhar Seeding या ऑप्शन वरती क्लिक करायचे .
५. आता तुमच्यासमोर आणखी नवे पेज येईल.त्यावर आधार क्रमांक टाका.खाली Request for Aadhar ला seeding या पर्यायावर क्लिक करा.
६. त्यानंतर खाली तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचे नाव निवडायचे आहे आणि खाली fresh seeding वर क्लिक करायचे आहे.
७. बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे.
८. टर्म्स अँड कंडिशन्सना वाचून त्यांचा स्वीकार करायचे आहे.त्यानंतर कॅपचा कोड आला असे भरा आणि सबमिट करा.
अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमचा आधार कार्ड बँक सोबत लिंक करू शकता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!