- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यातील भद्रावती आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी)मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.ज्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आधी मंजूर झाल्या,त्यांनाही कामावर तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.फक्त वैद्यकीय कारणास्तवच सुट्टी मंजूर करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून येथील आयुध निर्माणीला दारूगोळा उत्पादनाच्या वाढीचे निर्देश देण्यात आले आहे.त्यासाठी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. भद्रावती येथील आयुध निर्माणी कारखाना हा चांदा आयुध निर्माणी म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो. पुढील सहा महिने पुरेल एवढा शस्त्रसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट इथे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर झालेला तणाव लक्षात घेता केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता पडू नये,यादृष्टीने देशातील सर्व आयुध निर्माणींना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- Advertisement -

