उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- ऑनलाइन गेमिंग बादशाह सोंटू (अनंत ) नवतरन जैन याने आपल्या तिजोरीतील रक्कम आपल्या मित्र मंडळींकडे ठेवली होती.काल शुक्रवारी २० ऑक्टोंबर २०२३ रोजी आर्थिक गुन्हे शाखाच्या पथकाने सोंटूचा मित्र डॉ.गौरव बग्गा याच्या घरावर छापामार करीत कारवाई केली.यात पाच बॅग रोकड व सोन्याची बिस्किटे आढळून आली.सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेल्या कारवाईत ७० लाख रुपये व दोन किलो सोन्याची बिस्किटे ताब्यात घेण्यात आली.
आरोपी सोंटू जैन याने नागपूरातील व्यापाऱ्याची ५८ कोटी रुपयांनी ऑनलाइन गेमिंगमध्ये फसवणूक केली ही.त्यामुळे तो नागपूर पोलिसांच्या रडारवर होता. त्याच्या घरावर तक्रारीच्या अनुषंगाने २२ जुलै रोजीच्या धडक कारवाईत पोलिसांना १७ कोटी रुपये, १४ किलो सोने व २९४ किलो चांदी आढळून आली होती.दरम्यान, पोलिसांनी त्याच्या बँक लॉकरची झडती घेतली असता त्यातून ८५ लाख रुपये व साडेचार कोटी रुपयाचे सोने जप्त केले होते.तर याच कालावधीत सोंटूच्या निकटवर्तीयांनी सोंटूला पळून जाण्यास मदत करून त्याच्या कुटुंबीयांच्या बँक लॉकरमधून रोकड व सोने काढून त्याच बँकेत दुसरे लॉकर घेऊन त्यात बदली केले होते.तसे फुटेजही बँकेच्या सीसीटिव्हीमध्ये कैद आहे.तर याच आरोपाच्या आधारे आरोपी सोंटूची चौकशी करून शुक्रवारी सकाळीच नागपूर येथील आर्थिक गुन्हे शाखाच्या पथकाने सोंटूचा मित्र डॉ.गौरव बग्गा याच्या घरावर छापा मारला.यात पुन्हा मोठे घबाड पुढे आले. दरम्यान, कारवाई सुरू असतानाच या परिसराचा वीज खंडित झाल्याने एकूण किती मालमत्ता सापडली याचा हिशेब लागला नसून उशिरापर्यंत तपास सुरूच होता.तोपर्यंत पथकाने ७० लाख रुपये रोख व दोन किलो सोन्याची बिस्किटे हस्तगत केली होती.
सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर सोने वकिलामार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती.मात्र,उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला.त्यानंतर सोंटूने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.९ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन फेटाळत सात दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्याच्यासमोर पर्याय नव्हता.दरम्यान,१६ ऑक्टोबरला त्याने प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती.त्यानंतर सोंटू जैनची कसून तपासणी केल्यानंतर पोलिसांना काही नावे मिळाली आहेत.
सोंटूने पोलिसांना सांगितल्यानुसार डायमंड एक्सचेंज डॉट कॉम मध्ये त्याचे ४० टक्के हिस्से असून त्यातून होणारा लाभ हा सर्वरच्या माध्यमातून हिस्सेदारांना वाटणी होत असे.दरम्यान,सोंटूने पोलिसांना आपल्या पार्टनर व सट्टेखोरांच्या नावाची यादी दिली असल्याची माहितीही पुढे आली आहे.यात कोलकाताच्या एका सट्टेखोरासह गोंदिया शहरातील आठ जणांची नावे असल्याचे कळते.दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत आणखी काही मोठी नावे पुढे येण्याची शक्यता आहे.