Tuesday, July 21, 2026
Homeचंद्रपूरऐकावे ते नवलच...! ज्याला बँकेची जबाबदारी दिली त्यानेच केला घपला.. -बँक अधिकाऱ्याने...

ऐकावे ते नवलच…! ज्याला बँकेची जबाबदारी दिली त्यानेच केला घपला.. -बँक अधिकाऱ्याने ३६ खातेदारांच्या १ कोटी ७ लाख रुपयांवर मारला डल्ला.. – विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील प्रकार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या भद्रावती शाखेतून ३६ खातेदारांचे १ कोटी ७ लाख रूपये बँक अधिकाऱ्यानेच परस्पर स्वतःच्या व अन्य दोघांच्या खात्यात वळते केले.ही धक्कादायक घटना काल, शुक्रवारी ८ नोव्हेंबरला उघडकीस आली.बैंक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून बैंक अधिकारी रजत ईटणकर, सुरज कुमार साहू रा.नागपूर,प्रदीप दूधभाते रा.पुणे अशी आरोपींची नावे आहेत.
विदर्भ कोकण ग्रामीण बैंक भद्रावती शाखेचे व्यवस्थापक अमोल कठाळे यांचा १ सप्टेंबर रोजी अपघात झाला.त्यामुळे रजेवर होते.या कालावधीत बँकेचे मुख्य अधिकारी म्हणून रजत इटणकर यांच्याकडे जबाबदारी होती.दरम्यान,पार्वता काकडे यांच्या बँक खात्यातून ३ लाख ५० हजार रूपये परस्पर काढल्याची तक्रार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली.चौकशीअंती इटनकर यांनीच शेगाव शाखेत कार्यरत असतांना हा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले.याविरूद्ध शेगाव ठाण्यात तक्रार झाली.आरोपी अधिकारी इटणकर यांच्यावर वरिष्ठांना संशय आल्याने भद्रावती शाखेतील खातेदारांचीही तपासणी केली.त्यात ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोंबर २०२४ पर्यंत ३६ खातेदारांच्या खात्यातून १ कोटी ७ लाख गहाळ केल्याचे उघडकीस आले.ही रक्कम इटणकरने बँक अधिकारी असलेल्या सुरज कुमार साहू व प्रदीप दूधभाते या मित्रांच्या संगनमताने आरटीजीएस,नेफ्ट व रोखद्वारे गहाळ केल्याचे आढळून आले.पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहेत.
असा वापरला फंडा👇
बँकेतून ऑनलाइन किवा रोख रक्कम खात्यातून दुसया खात्यात टाकायचे असेल,तर एन्ट्री करण्यास बँक अधिकारी लागतो.हा अधिकारी व्हेरिफाय करतो. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही,तोपर्यंत रक्कम दुसऱ्या खात्यात वळती होत नाही.आरोपी रजत इटणकर याच्या प्रक्रियेला सुरत साहू व प्रदीप दूधभाते हे दोघे अधिकारी व्हेरिफाय करत होते.तिघांच्या संगनमतातून १ कोटी ७ लाखांची रक्कम परस्पर वळती करण्यात आली.
अमोल कठाळे,शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक,भद्रावती👇
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ३६ खातेदारांचे १ कोटी ७ लाख रूपये परस्पर वळती करण्यात आले. मात्र,खातेदारांनी घाबरू नये.काही खातेदारांची रक्कम परत मिळाली.उर्वरित रक्कमही लवकरच जमा होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!