उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप उपक्रम ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद व महानगर पालिकाच्या वतीने उद्या २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम उद्यानात स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांना अभिवादन करण्यात येणार आहे.वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रम सुरू होईल.शीलाफलक अनावरण,पंचप्रण शपथ,वसुधा वंदन,वीरों का वंदन अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांना नमन,ध्वजारोहण व राष्ट्रगीत होणार.सकाळी ८.३० वाजता हुतात्मा स्मारक ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम उद्यानपर्यंत अमृत कलश यात्रा निघेल.सायंकाळी ६ वाजता चांदा क्लब वर सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने साद सह्याद्रीची भूमी महाराष्ट्राची अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम होईल.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुजा सावंत,गायक नंदेश उमप व अभिनेता श्रेयस तळपदे हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असतील.विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार,अशोक नेते,रामदास आंबटकर,अभिजित वंजारी,सुधाकर अडबाले, कीर्तीकुमार भांगडिया,सुभाष धोटे,किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.