Sunday, June 21, 2026
Homeदेसाईगंजउद्याला किन्हाळा-मोहटोला येथे भव्य आरोग्य  मेळाव्याचे आयोजन…-मेळाव्यास विजय वडेट्टीवार सह खासदार नामदेवराव...

उद्याला किन्हाळा-मोहटोला येथे भव्य आरोग्य  मेळाव्याचे आयोजन…-मेळाव्यास विजय वडेट्टीवार सह खासदार नामदेवराव किरसान व अन्य मान्यवरांची उपस्थिती…-देसाईगंज तालुक्यातील जनतेंनी लाभ घेण्याचे आवाहन- काँग्रेसचे रामदास मसराम 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):-पावसाळा सुरू झाला की, सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,वयोवृद्ध, आबालवृद्ध यांना आरोग्याची समस्या नेहमीच भेडसावत असते.सगळ्यांकडे वेळेवर पैसा असतोच असे नाही.काहीजण पैस्या अभावी वेळेवर उपचार घेत नसल्याने स्वतःचा जीव गमावून बसतात.त्यामुळे गोर-गरीब जनतेची कळकळ लक्षात घेता काँग्रेस नेते रामदास मसराम तसेच मित्र परिवारांतर्फे संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये ‘आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा’ या उदात्त हेतूने सर्वत्र आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.आतापर्यंत गावो-गावी एकूण सहा आरोग्य मेळावे राबविण्यात आले असून उद्या शनिवार,दिनांक-१३ जुलै रोजी देसाईगंज तालुक्याच्या किन्हाळा-मोहटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भव्य आवारात सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी,मोफत औषध वाटप,रक्तदान शिबिर,नेत्र तपासणी तथा मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर शिबिराचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सत्कारमूर्ती गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेवराव किरसान,मेळाव्याचे अध्यक्ष गडचिरोली काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे  हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

‘तुमचे आरोग्य संवर्धन हेच आमचे धोरण’ असे आयोजित शिबिराचे ब्रीद असून त्या अनुषंगाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात शुअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जामठा नागपूर तथा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.शिबिरात हृदयरोग,हाडांचे आजार,सामान्य रोगांची तपासणी,नेत्र तपासणी,मोफत चष्मे वाटप,मोफत औषध वाटप,मधुमेह तपासणी,ई.सी.जी तपासणी व इतर तपासण्या करण्यात येणार आहेत.

अधिक माहितीकरिता सागर वाढई,जावेद शेख, अमोल मिसार आदींशी संपर्क साधावा; असे मसराम यांनी कळविले आहे. देसाईगंज तालुक्यातील जनतेसह किन्हाळा-मोहटोला परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा; असे आवाहन माजी पं.स.सभापती परसराम टिकले, काँग्रेस जेष्ठ नेते यादवराव ठाकरे,काँग्रेसचे माजी उपसभापती नितीन राऊत,ग्रा.पं.सदस्य परशुराम ठाकरे तसेच किन्हाळा ग्रा.पं.सदस्य प्रमोद पत्रे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात; सत्ताधारी आणि विरोधक येणार आमनेसामने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे उद्या,सोमवार २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. सदरचे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून राज्य...

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!