- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांची उद्या,बुधवार दिनांक- १३ नोव्हेंबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ भव्य-दिव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर सभेस गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे खासदार नामदेव किरसान,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे तथा काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे.
कुठलीही सत्ता व पद नसतांना लोकसेवेचा वसा जपणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांना धनशक्तिने नाही तर जनशक्तीने जनतेनी पसंती दिली असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.अशातच उद्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांची तोफ आरमोरी येथे दुपारी १ वाजेच्या सुमारास जीवानी यांच्या खुल्या पटांगणावर नवीन बस डेपोच्या बाजूला गडाडणार असल्याने सदर प्रचार सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

