Friday, June 19, 2026
Homeनवी दिल्लीउद्यापासून लागू होणार नवी करप्रणाली... - गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते बँक...

उद्यापासून लागू होणार नवी करप्रणाली… – गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते बँक खाते,क्रेडिट कार्ड आदींच्या नियमावलीतील बदलास होणार प्रारंभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-उद्यापासून म्हणजेच १ एप्रिल पासून नवे आर्थिक वर्ष २०२५-२६ सुरू होणार आहे.नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस अर्थात उद्या,मंगळवार १ एप्रिलपासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीपासून ते बँक खाते,क्रेडिट कार्ड आदींच्या नियमावलीतील बदलास प्रारंभ होणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या नवीन कर दरांची अंमलबजावणी उद्या १ एप्रिलपासून होणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला तेल आणि वायू वितरण कंपन्यांच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होतात.गेल्या काही महिन्यांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये चढ-उतार दिसून आले आहेत; तर घरगुती १४ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.उद्या २०२५-२६ या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ग्राहकांना गॅसच्या दरांमध्ये काही प्रमाणात सवलतीची अपेक्षा आहे.१ एप्रिल २०२५ पासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.यामध्ये रिवॉर्ड पॉईंट्स आणि अन्य सुविधांमध्ये बदल होईल. भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेसह इतर अनेक बँका त्यांच्या बचत खात्यांमध्ये न्यूनतम शिल्लक नियम बदलत आहेत.नवीन नियमांनुसार, खातेधारकांना सेक्टरनुसार मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल.खात्यात पुरेसा शिल्लक नसेल,तर दंड आकारला जाऊ शकतो.यूपीआय अकाऊंट बंद होण्याची शक्यता जर एखाद्या मोबाईल नंबरशी लिंक असलेले यूपीआय खाते दीर्घकाळ सक्रिय नसेल तर बँक ते बंद करू शकते.जर तुम्ही तुमच्या यूपीआय अकाऊंटचा बराच काळ वापर केला नसेल, तर १ एप्रिलपासून तुमच्या बँकेच्या रेकॉर्डमधून तो नंबर हटवला जाऊ शकतो.१२ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना करमुक्ती मिळेल. वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शन ७५ हजार रुपये करण्यात आले आहे.याचा अर्थ १२.७५ लाख रुपयांपर्यंत वेतन असलेल्यांना कर भरावा लागणार नाही.हे नियम नवीन कर प्रणाली स्वीकारणाऱ्यांसाठी लागू असतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!