Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजआमदार रामदास मसराम यांच्या हस्ते कोंढाळा देवस्थान परिसरात संरक्षण भिंत बांधकामाचे...

आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते कोंढाळा देवस्थान परिसरात संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते गावातील दत्त मंदिर देवस्थान परिसरात नवीन संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन काल,रविवार ३० मार्च रोजी विविध मान्यवर तथा गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले.
गुढी पाडवा दिनाचे औचित्य साधून दत्त मंदिर देवस्थानात गुढी उभारून समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळच्या सुमारास गोपालकाला तसेच प्रसाद वितरण प्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी हजेरी लावली.अशातच कोंढाळा गावातील दत्त मंदिर देवस्थान परिसर खुले पटांगणात असल्याने संरक्षण भिंतीची निकड लक्षात घेता आमदार मसराम यांनी आपल्या स्थानिक आमदार निधीतून १० लक्ष रुपयांचे नवीन संरक्षण भिंत बांधकाम मंजूर करीत बांधकामाचे भूमिपूजन केले.नवीन संरक्षण भिंत बांधकामामुळे दत्त मंदिर देवस्थान परिसर सुशोभित होणार असून मोकाट जनावरे तसेच इतर बाबींपासून मंदिराचे संरक्षण होणार असल्याने आमदार मसराम यांचे दत्त मंदिर देवस्थान समिती तसेच ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. भूमिपूजन प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले,माजी उपसभापती नितीन राऊत,पोलीस पाटील किरणताई कुंभलवार,देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,माजी सरपंच कैलास राणे,धनपाल मिसार,पुंडलिक बुराडे, सागर वाढई, प्रा.पंकज धोटे,निलेश दुपारे,जयंत दुपारे, अथर्व राणे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!