- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-एका दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्याने राहत्या घरीच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या कोजबी गावात घडली.संस्कार विनोद कन्नाके वय १० वर्षे, रा.कोजबी असे मृतक चिमुकल्याचे नाव असून मोठ्या बहिणीसमवेत आजी-आजोबाकडे राहून तो इयत्ता चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता.
संस्कार हा काल रविवारी दुपारच्या सुमारास बाहेरुन घरी परतला,त्यानंतर काही वेळाने आजी-आजोबाचे लक्ष नसतांना त्याने घरातच ओढणीने सहाय्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली.सदरची घटना आजी-आजोबांच्या निदर्शनास येताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील माधुरी सहारे यांना दिली. त्यानंतर,पोलीस पाटील यांनी आरमोरी पोलिसांना पाचारण केले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.विशेष म्हणजे,संस्कार हा घटनेची दिवशी बाहेरून घरी परतला आणि काही वेळातच त्याने गळफास घेतल्याने शंका-कुशंकेला पेव फुटले आहे. त्यातच,त्याचे आई-वडील कामासाठी बाहेर राज्यात गेले असतांनाच दहा वर्षाच्या मुलावर एवढे कोणते संकट ओढवले की,त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.त्यामुळे आत्महत्या की हत्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबतचा अधिकचा तपास आरमोरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
- Advertisement -

