उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- काही महिन्यांपासून गडचिरोली आणि देसाईगंज विभागात वाघांची दहशत कमी झाल्याचे हल्ली सगळीकडेच चित्र दिसून येत आहे.मात्र काल २४ फेब्रुवारी रात्रो च्या सुमारास वाघीण आपल्या चार बछड्यांसह आरमोरी-देसाईगंज मार्गावरून रस्ता ओलांडताना दिसल्याने ये-जा करणारे नागरिक भयभीत झाले आहेत.मागील एक ते दीड वर्षांपूर्वी देसाईगंज आणि गडचिरोली वनविभागाच्या काही भागात सिटी -१ आणि टी-६ वाघिणीने नागरिकांचा बळी घेऊन दहशत पसरविली होती.अशातच आता पुन्हा काल रात्रोच्या सुमारास रस्ता ओलांडतांना बछड्यांसह वाघिणीने दर्शन दिल्याने देसाईगंज-आरमोरी मार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहन धारकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.