- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला पार पडले.मतदानापूर्वी ‘आजची रात्र ही वैऱ्याची रात्र’ म्हणीत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा बोलबाला दिसून आला.धनशक्तीचा बोलबाला जरी झाला असला तरीही धनशक्ती पेक्षा जनशक्ती ही सर्वात शक्तिशाली मानली जाते.गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदासंघात यावेळी सर्वांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.अशातच उद्या,शनिवार दिनांक-२३ नोव्हेंबरला जिल्ह्यातील २९ उमेदवारांचे बंद मतपेट्यातील भवितव्य कळणार असून ‘आमची सीट निघाली गां भाऊ…!’ म्हणीत जल्लोष साजरा केला जाणार आहे.
आरमोरी विधानसभा मदारसंघाचा एकंदरीत मागील निवडणूक व यावेळी पार पडलेल्या निवडणुकीचा विचार केला तर यावेळी जनता,कर्मचारी वृंद,विविध पक्षातील नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या वतीने नव्या उमेदवारांना मिळालेली पसंती ही गेम चेंजर म्हणून ठरू शकते. त्यामुळे यावेळी ‘धनशक्ती v/s जनशक्तीची ताकद’ अनेकांना काही फरकाने तरी पहावयास मिळणार आहे.
आरमोरी विधानसभा मतदार संघात यावेळी ८ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते.यामध्ये रामदास मळूजी मसराम-इंडियन नॅशनल काँग्रेस,कृष्णा दामाजी गजबे-भारतीय जनता पार्टी,आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष,शिलू प्रविण गंटावार-अपक्ष,मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी,चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम),अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी,खेमराज वातूजी नेवारे-अपक्ष इत्यादींनी विधानसभा निवडणुकीत उडी मारत नशीब आजमावू पाहिले.अशातच ८ उमेदवारांनी जरी आमदारकीसाठी नशीब आजमावू पाहिले असले,तरीही यावेळेस केवळ दोनच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पहावयास मिळाली आहे.यामध्ये भाजपा v/s काँग्रेस.त्यामुळे सर्वत्र जास्तीत जास्त धनशक्तीचा मारा पहावयास मिळाला.काहींनी धनशक्ती ही माझीच आहे; असे म्हणीत जनशक्तीकडे वळती न करता आपलेच घर भरल्याची चर्चा रंगू लागली आहे.त्यामुळे पुढील जिल्हा परिषद,नगरपरिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीत यांना त्यांची जागा दाखवून देऊ; अशीही चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र सुरू आहे.झाले-गेले पार पडले जरी असले तरीही उद्याला कळणार की, ‘आमची सीट निघाली भाऊ…!’ अशातच केवळ नेते,पदाधिकारीच यांचा सत्कार करून चालणार नाही,तर यात जनतेचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांना विसरून चालणार नाही.
- Advertisement -