Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातून सर्वात जास्त मतदान आरमोरी विधानसभा मतदारसंघात.. - तीनही विधानसभा मतदारसंघात...

गडचिरोली जिल्ह्यातून सर्वात जास्त मतदान आरमोरी विधानसभा मतदारसंघात.. – तीनही विधानसभा मतदारसंघात ६ लाख १८ हजार २३६ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी ७५.२६ टक्के मतदान झाले आहे.आरमोरी विधानसभा मतदार संघात ७६.९७ टक्के,गडचिरोली ७४.९२ टक्के तर अहेरी विधानसभा मतदारसंघात ७३.८९ टक्के मतदान झाले आहे.
 
आरमोरी मतदारसंघ👇
 
आरमोरी मतदारसंघात १ लाख ३१ हजार ६० पुरुष मतदार,१ लाख ३१ हजार ७१० महिला आणि १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ६२ हजार ७७१ मतदार होते.त्यापैकी १ लाख २ हजार ७२० पुरुष,९९ हजार ५४६ महिला व १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख २ हजार २६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली मतदारसंघ👇
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात एकूण १ लक्ष ५४ हजार ६१० पुरुष मतदार,१ लाख ५२ हजार ६१० महिला व ३ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार होते.यातील १ लाख १६ हजार ७०४ पुरुष मतदार,१ लाख १३ हजार ४६९ स्त्री मतदार तर १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ३० हजार १७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अहेरी मतदारसंघ👇
अहेरी विधानसभा मतदारसंघात एकूण १ लक्ष २६ हजार ४८१ पुरुष मतदार,१ लाख २४ हजार ९७१ महिला व ६ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ५१ हजार ४६१ मतदार होते.यातील ९५ हजार ५११ पुरुष मतदार,९० हजार २८१ महिला मतदार तर ३ तृतीयपंथी असे एकूण १ लाख ८५ हजार ७९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ लाख १२ हजार १५१ पुरुष मतदार,४ लाख ९ हजार २९४ महिला आणि १० तृतीयपंथी असे एकूण ८ लाख २१ हजार ४५५ मतदार होते.त्यापैकी ३ लाख १४ हजार ९३५ पुरुष,३ लाख ३ हजार २९६ महिला व ५ तृतीयपंथी असे एकूण ६ लाख १८ हजार २३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!