Wednesday, July 15, 2026
Homeमुंबईआनंदाची बातमी.. धानोरा तालुक्याच्या चातगांव येथे नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती..

आनंदाची बातमी.. धानोरा तालुक्याच्या चातगांव येथे नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली/मुंबई :-गडचिरोली जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दिशेने पुढे जातांना धानोरा तालुक्यातील चातगांव येथे नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली असून या ठाण्यासाठी एकूण ११० नवीन पदांची निर्मिती करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त प्रतिमेला भूतकाळात सोडून,येथे मजबूत सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा आणि शाश्वत विकासासाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून चातगांव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे.या पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन येत्या,शुक्रवार १४ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कळविले आहे. चातगांव परिसरात ५० हून अधिक गावे जोडलेली असून, भौगोलिकदृष्ट्याही या भागाचे महत्त्व विशेष आहे.नवीन पोलीस ठाण्यामुळे येथे गस्त वाढविणे,गुन्हेगारी आणि नक्षल कारवायांवर नियंत्रण ठेवणे अधिक प्रभावीपणे शक्य होईल.तसेच नागरिकांना तात्काळ मदत व न्याय मिळण्यासही सुविधा निर्माण झाली आहे.यामुळे पोलीस व जनतेतील संवाद वाढून विश्वास,सहकार्य आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!