Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडाट्रॅक्टर पलटून एकजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी.. - कुरखेडाच्या वडेगाव...

ट्रॅक्टर पलटून एकजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी.. – कुरखेडाच्या वडेगाव मार्गावरील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या वडेगाव-ईळदा मार्गावरील वळणावर ट्रॅक्टर पलटून एकजण घटनास्थळीच ठार झाला,तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अपघातात २२ वर्षीय कृष्णा चिलाप हा जागीच ठार झाला.तर २४ वर्षीय रेवचंद भानूजी सहारे व २६ वर्षीय अंशूमन हिरालाल नाईक हे गंभीर जखमी झाले.मृतक आणि गंभीर जखमी झालेले गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला येथील रहिवासी असून चौघेजण एमएच-३५ एडब्ल्यू-६२८४ क्रमाकांच्या ट्रॅक्टरने काल मंगळवारी सकाळच्या सुमारास कोरंभीटोला येथून वडेगाव मार्गे सिमेंट विटा भरून कुरखेडा तालुक्यातील बांधगाव येथे जात होते.दरम्यान,ईळदा वरून काही अंतरावर असलेल्या वडेगाव मार्गावरील वळणावर येताच भरधाव वेगात असणारा ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाला.यात ट्रॅक्टरचालक मनोहर राजीराम राऊत रा.कोरंभीटोला हा थोडक्यात बचावला,तर ट्रॉलीवर बसलेला कृष्णा चिलाप हा जागीच ठार झाला आणि दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच घटनास्थळी धाव घेत कुरखेडा पोलिसांना पाचारण करण्यात आले. जखमींना तात्काळ कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएसआय संदीप ताराम यांनी सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!