Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलीस-नक्षल चकमक; नक्षलवाद्यांच्या सहा मृतदेहासह नक्षली साहित्य हस्तगत..!

पोलीस-नक्षल चकमक; नक्षलवाद्यांच्या सहा मृतदेहासह नक्षली साहित्य हस्तगत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षल विरोधी अभियानादरम्यान अचानक सुरू झालेल्या गोळीबारात चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनी सहा नक्षलवाद्यांना यमसदनी धाडून घटनास्थळावरून इन्सास रायफल,स्टेनगन,३०३ रायफल,स्वयंचलित शस्त्रे,स्फोटके आणि इतर  साहित्य जप्त करण्यात आले आहे.सदरची चकमक ही छत्तीसगडच्या विजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील घनघोर जंगलात घडली.काल मंगळवार सकाळपासूनच उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये गोळीबार सुरू होता.चकमक संपताच
सायंकाळी शोध मोहिमेदरम्यान,सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह तसेच नक्षली सहित्ये आढळून आली.रात्रीपर्यंत नक्षलवाद्यांची ओळख पटवणे सुरू होते.काही नक्षलवाद्यांची ओळख पटली असून इतर नक्षलवाद्यांची ओळख आणि त्यांचा कोणकोणत्या घटनांमध्ये सक्रिय सहभाग होता,याची चौकशी सुरू असल्याचे विजापूरचे पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!