- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशनकार्डद्वारे मोफत रेशन देते.यामध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जातो; मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर ९ वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात.यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत.रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते.मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते.यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता.मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.
त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात येणार आहे.त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत.यामध्ये गहू,डाळी,हरभरा,साखर,मीठ,मोहरीचे तेल,मैदा,सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे.लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल,अशी आशा सरकारला आहे.
- Advertisement -