Wednesday, September 9, 2026
Homeनागपूरआज सकाळीच दाट वस्तीत बिबट्याची एंट्री; चार जण जखमी..

आज सकाळीच दाट वस्तीत बिबट्याची एंट्री; चार जण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-नागपूरच्या पारडी परिसरातील दाट लोकवस्तीमध्ये बिबट शिरल्यामुळे मोठी खळबळ माजली.बिबट्याला एक तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनंतर पकडण्यात आले आहे.आज बुधवारच्या सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान बिबट्याने या परिसरातील चार जणांना जखमी केले होते.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.पोलिसांनी बिबट लपून बसलेल्या घराच्या अवतीभवती कडक पहारा ठेवला होता.लागलीच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या शरीरावर दोन डॉर्ट मारले.हे डार्ट लागल्यानंतर गुंगीचे औषध बिबट्याच्या शरीरात भिनायला लागले.मात्र, त्याअवस्थेतही बिबट्याने १५ फूट उंच उडी मारली आणि दुसऱ्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला.शरीरात औषध लागताच बिबट्या खाली कोसळला आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले.तत्पूर्वी बिबट्याने बराच वेळ धुमाकूळ घातला होता.दोन दिवसांपूर्वीही एका बिबट्याने नागपूरच्या कापसी भागात एंट्री केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!