- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-धानाला योग्य हमीभाव,प्रलंबित बोनस तातडीने द्यावा,दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळलेले भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुके समाविष्ट करावेत आणि धानाचे चुकारे ४८ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत,या प्रमुख मागण्यांसाठी आज,सोमवार ५ ऑक्टोंबरला
भारतीय किसान संघातर्फे साकोली येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.दुपारी बारा वाजता उपविभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असून पूर्व विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
संघाच्या विदर्भ प्रांताच्यावतीने आयोजित या आंदोलनात भंडारा,गोंदिया,चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी होणार आहेत. ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या संख्येने शेतकरी साकोलीत दाखल होणार असल्याने आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या मोर्चाला भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष साई रेड्डी संबोधित करणार आहेत.संघाचे अखिल भारतीय अधिकारी नाना आखरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटित ताकद दाखवून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.धानाला योग्य भाव, बोनस,दुष्काळी मदत आणि वेळेत चुकारे या शेतकऱ्यांच्या मुलभूत मागण्या आहेत.या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी,असे आवाहन किसान संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे,जिल्हा मंत्री दिनेश कापगते,गोंदिया जिल्हाध्यक्ष डॉ.मंगल बिसेन आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.आज दुपारी बारा वाजता साकोली उपविभागीय कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनातून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- Advertisement -

