- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात आज,बुधवार १० डिसेंबरला अपघातांच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून पहिली घटना गडचिरोली शहरात सकाळच्या सुमारास घडली.यात ४२ वर्षीय शिक्षिका ममता धर्माजी बांबोळे यांचा मृत्यू झाला.तर दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका ग्रामसेवकाचा मृत्यू झाला आहे.
कोरची तालुका मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहगाव येथील मुख्य मार्गाच्या वळणाजवळ दुपारी एक वाजेच्या दरम्यान साकोली डेपोची एमएच ४० वाय ५२०७ क्रमांकाची नियमित बस कुरखेडा व्हाया कोरची जात असतांना समोरून येणाऱ्या सुरजागड लोह प्रकल्पाचा कच्चा माल घेऊन रायपूरला जाणारा एमएच ४० बीजी ९०५७ क्रमांकाचा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन बसचा समोररील भाग चेंदामेंदा झाला.घटना घडताच बस चालक राहुल जगबंधू वय ५६ वर्षे यांनी प्रसंगावधान साधत बसखाली उडी मारल्याने थोडक्यात बचावले.मात्र,बसमधील प्रवाशांना जखमा झाल्या.बसमध्ये एकूण १२ प्रवासी होते.त्यातील ३ महिला जखमी झाल्या.कमलाबाई मडावी वय ५६ रा. नकटी,ता.देवरी,जि.गोंदिया या गंभीर जखमी असून त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.तर लता वट्टी वय २३ वर्षे रा.मसेली, ललिता भक्ता वय ३० वर्षे,रा.कोचीनारा, ता.कोरची या महिला जखमी झाल्या.
दुसराही अपघात हा कोरची तालुका मुख्यालयापासून कुरखेडा मार्गे अवघ्या चार किलोमीटर अंतरावर घडला. चार किलोमीटर अंतरावरील बेळगाव नजीक जिल्हा परिषद शाळेसमोर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रक्स(मॅक्स)पलटी झाली.यात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. टॅक्सीत १३ ते १४ प्रवासी असल्याची माहिती आहे.वाहन पलटी होताच कोरची तालुक्याच्या अल्लीटोला ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवक दिलीप रामचंद्र धाकडे वय ४९ वर्षे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,ते गांधीनगर येथील रहिवासी होते.एमएच २२ डी १९९० क्रमांकाची खाजगी ट्रक्स ही कोरची वरून कुरखेडा मार्गे येत असतांना सदरचा अपघात घडला.अपघातात उज्वला आदेश राऊत वय २५ वर्षे रा.मसेली या गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर
मंगलीबाई गुरुभिले वय ४५ वर्षे,रा.जामणारा,ता. कोरची, चालक व्यंकट नानाजी सीडाम वय ५२ वर्षे,रा.मालदुगी, ता.कुरखेडा,जि.गडचिरोली अशी जखमींची नावे असून सर्वांवर कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.घटनेचा तपास कोरची पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
- Advertisement -

