Tuesday, July 14, 2026
Homeमुंबईआजचे मंत्रिमंडळ निर्णय.. थेट नगराध्यक्ष,आरोग्य सेविका आणि सरपंच संवाद कार्यक्रम..

आजचे मंत्रिमंडळ निर्णय.. थेट नगराध्यक्ष,आरोग्य सेविका आणि सरपंच संवाद कार्यक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतांनाच आज,बुधवार २४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.यामध्ये नगरविकास विभाग,ग्रामविकास व पंचायत राज विभाग, सामान्य प्रशासन विभाग व महसूल विभागाचा समावेश आहे.
१.ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा प्रश्न आता सुटला आहे.यामुळे हजारो आरोग्य सेविकांना मोठा आर्थिक आणि सेवाविषयक लाभ मिळणार आहे.
२.नगरविकास विभागातर्फे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच त्याला मताचाही अधिकार मिळेल.नगर विकास विभागाचा हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.या सुधारणेमुळे थेट जनतेने निवडून दिलेल्या अध्यक्षांना परिषदेचे पूर्ण सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार मिळेल.
३.साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आणि पुतळा उभारण्यासाठी धाराशिव शहरात दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
४.सामान्य प्रशासन विभागातर्फे ‘जिल्हा कर्मयोगी २.०’ आणि ‘सरपंच संवाद’ हे कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.या उपक्रमामुळे ग्राम,तालुका आणि जिल्हा स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेत समन्वय वाढेल.तसेच सरपंचांशी थेट संवाद साधून गावपातळीवरील समस्या तातडीने सोडवण्यावर भर दिला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!