Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनवे नियम.. 'या' कारणामुळे रेशन कार्ड होणार बंद - नवीन कार्ड...

नवे नियम.. ‘या’ कारणामुळे रेशन कार्ड होणार बंद – नवीन कार्ड मंजूर करतांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी कडक पावले उचलली आहेत.जुलै २०२५ मध्ये केंद्र सरकारने “लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली(नियंत्रण)सुधारणा आदेश” अधिसूचित केला आहे.या नवीन नियमानुसार,ज्या कुटुंबांनी रेशन दुकानातून सलग ६ महिने धान्याची उचल केली नाही,तर अश्यांचे रेशन कार्ड ‘इनॲक्टिव्ह’ म्हणजेच निष्क्रिय(बंद) केले जाईल.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन मिळणारे लाभार्थीही या कक्षेत येणार आहेत.केवळ रेशन मोफत आहे म्हणून ते उचलले नाही, तरीही तुमचे कार्ड रद्द होण्याची टांगती तलवार असेल. आता केवळ रेशन कार्ड असणे पुरेसे नाही,तर दर पाच वर्षांनी तुमची पात्रता तपासली जाणार आहे.रेशन कार्डमधील पाच वर्षांखालील मुलांचा आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे.तसेच मुलांचे वय ५ वर्षे पूर्ण होताच त्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक असेल.जर एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नोंद आढळली,तर ते कार्ड तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल आणि तपासणीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.नवीन रेशन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेतही सरकारने बदल केले आहेत.यापुढे नवीन कार्ड मंजूर करतांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाचा वापर केला जाईल. प्रत्येक राज्याला आपल्या पोर्टलवर नवीन कार्डसाठीची प्रतीक्षा यादी जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!