Monday, August 17, 2026
Homeभंडाराअस्वलाच्या मृत्यूने वनविभागात खळबळ..!

अस्वलाच्या मृत्यूने वनविभागात खळबळ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर परिसरात एका जखमी नर अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने वन विभागात एकच खळबळ माजली.वनरक्षक ए.सी.हटकर आणि मजूर अभयारण्यातील मांडणगाव परिसरात गस्तीवर  असतांना त्यांनी वन्यप्राण्यांच्या ओरडण्याचे आवाज ऐकले.दरम्यान,आवाजाच्या दिशेने गेले असता एका नाल्यात एक अस्वल हातपाय हलवत विव्हळत होते. त्यानंतर,काही क्षणातच त्याची हालचाल बंद झाली. याबाबतची माहिती मिळताच क्षेत्र संचालक पियुषा जगताप,उपसंचालक प्रितमसिंग कोडापे यांच्या मार्गदर्शनात कोका वनक्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक सुहास कांबळे,वनपरिक्षेत्र अधिकारी सुरजकुमार गोखले यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपास केला असता अस्वलाच्या शरिरावर खोल जखमा आढळून आल्या. तसेच पायवाटेवर रक्त सांडलेले दिसले.झुंजीचे निशाणदेखील दिसून आले.अस्वलाचा मृत्यू वन्यप्राण्यांचे झुंजीत,तसेच त्याचे वय सुमारे पाच वर्षे असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.एनटीसीएच्या प्रमाणभूत कार्यपध्दतीनुसार दुसऱ्या प्राण्याचा शोध घेतला जात असून सदर प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सुरजकुमार गोखले,क्षेत्र सहाय्यक नरडंगे, मेश्राम व हटकर करीत असून मृत अस्वलाचे नमुने उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!