Monday, June 22, 2026
Homeनागपूरअवैध वाळू उत्खननावर आळा घालण्यासाठी ड्रोनद्वारे राहणार पाळत...

अवैध वाळू उत्खननावर आळा घालण्यासाठी ड्रोनद्वारे राहणार पाळत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अवैध वाळू व गौण खनिजाच्या
उत्खननावर आळा घालण्यासाठी व दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी या दृष्टीने जिल्ह्यातील वाळूघाट व खदानींवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहे. वाळूघाट व गौण खनिजसंदर्भात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ड्रोनद्वारे प्रत्यक्ष जागेवरचे फुटेज आपल्या हाती लागल्यामुळे गुन्हेगारांवर सप्रमाण गुन्हा सिद्ध करण्यासह अशा कारवाईतील पारदर्शकता वाढीस लागेल.याच बरोबर शासनाच्या कारवाई पथकाला सुरक्षित राहून यामार्फत पुरावे गोळा करता येतील. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रगत सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज ड्रोनद्वारे वेळीच कारवाई करणे शक्य होईल. मनुष्यबळाच्या साहाय्याने यात अचूकता असल्याने संबंधित गुन्हेगारांना वेगळा वचक निर्माण होईल.या बैठकीस पोलिस महानिरीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,एसपी डॉ.हर्ष पोद्दार,जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसराच्या वेणा नदीत बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,नदीतील...

अवैध तंबाखू साठवणूक व विक्री करणाऱ्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रात गुटखा,पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने १९ जुलै २०१२ पासून सक्तीची बंदी लादली; मात्र गेल्या १४ वर्षांत ही बंदी कागदोपत्रीच...

शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी(बा.)वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील नागभीड तालुक्याच्या गिरगाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे,रा.गिरगाव,ता.नागभीड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!