Friday, September 25, 2026
Homeउत्तरप्रदेशपोलीस-नक्षल चकमकी दरम्यान १२ नक्षली यमसदनी..

पोलीस-नक्षल चकमकी दरम्यान १२ नक्षली यमसदनी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल गुरुवारी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सुरक्षा दलाने १२ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठविले आहे.बिजापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जंगलात सुरक्षा दलाने केलेल्या नक्षलवादविरोधी कारवाईदरम्यान ही घटना घडली.कारवाईत जिल्हा राखीव दलाचे तीन जिल्ह्यांतील जवान, सीआरपीएफच्या कोब्रा विंगच्या पाच बटालियन तसेच २२९व्या बटालियनचे जवान सहभागी झाले होते.चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करून पुन्हा त्या भागात नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.चकमकीमध्ये सुरक्षा दलाची कोणतीही हानी झालेली नाही.
बस्तरचे आयजी सुंदरराज पी.यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.विजापूर,डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा,कोब्राच्या वेगवेगळ्या बटालियन आणि सुमारे १२०० ते १५०० सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे.काही बडे नक्षलवादी नेते जंगलात आहेत.विजापूरमध्येच आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!