Saturday, May 2, 2026
Homeउत्तरप्रदेशइंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने बस कंडक्टरचा चिरला गळा….बसच्या तिकीटावरून झाला होता वाद…

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने बस कंडक्टरचा चिरला गळा….बसच्या तिकीटावरून झाला होता वाद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

उत्तर प्रदेश :- राज्याच्या प्रयागराजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.धावत्या बसमध्ये एका तरुणाने बस कंडक्टरवर चॉपरने हल्ला केला आणि त्यानंतर बसमधून खाली उतरून पसार झाला.जखमी बस कंडक्टरला प्रयागराजच्या एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, हा हल्ला करणारा आरोपी इंजिनीअरिंगचा विद्याथ्यर्थी असून या आरोपीने हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओही जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओमध्ये आरोपीने कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याचे कारण सांगितले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली.घटनेत वापरलेले हत्यार जप्त करण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसांवर गोळीबारही केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला असता आरोपीच्या पायाला गोळी लागली.

प्रयागराज सिव्हील लाइन्सहून करछना जाण्याऱ्या इलेक्ट्रीक बसमध्ये प्रवास करत असलेल्या इंजिनीअरिंगचा विद्यार्थी लारेब हाशमी आणि बस कंडक्टर हरिकेश विश्वकर्मा यांच्यात बसच्या तिकीटावरून वाद झाला होता. वाद इतका वाढला की आरोपीने कंडक्टवर चॉपरने हल्ला केला, या हल्ल्यात बस कंडक्टरच्या मानेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. बसमध्ये सगळीकडे रक्ताचा सडा पडला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेला कंडक्टरसोबतचा वाद कारणीभूत असल्याते बोलले जात होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!