Monday, August 31, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा येथे "मन की बात" कार्यक्रम संपन्न…-नगरसेवक रविंद्र गोटेफोडे यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा...

कुरखेडा येथे “मन की बात” कार्यक्रम संपन्न…-नगरसेवक रविंद्र गोटेफोडे यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची दिली माहिती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा येथे आज दिनांक-२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून सदैव गोर- गरीब व सर्व सामान्य नागरिकांच्या कार्यासाठी सदैव कार्यतत्पर राहून धजावणारे कुरखेडा नगरपंचायतीचे सर्वांचे लाडके नगर सेवक रविंद्र गोटेफोडे यांनी सर्वसामान्य जनतेची कळकळ लक्षात घेता कुणालाही त्रास होऊ नये; याकरिता स्वतः पुढाकार घेऊन व शहरातील मान्यवरांच्या सहकार्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाचे आयोजन स्वतःच्या घरी करून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती देण्यात आली.

सर्वप्रथम मान्यवरांच्या व शहरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. भारतीय संविधान हे डॉ.बाबा साहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी लिहिले संविधान आहे.त्यामध्ये सार्वभौमत्व,अभिव्यक्ती,विचार,स्वतंत्रता व देशाचे ऐक्य अबाधित राहावे; यासाठी सदैव प्रयत्न करून रात्रंदिवस एक केल्याचे प्रतिपादन सदर कार्यक्रमाप्रसंगी गोटेफोडे यांनी व्यक्त केले.त्यानंतर उपस्थित परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे समजून सांगितले.अर्ज कसा भरायचा,कुठे भरायचा व त्यासाठी लागणाऱ्या कागद पत्रांची पूर्तता कशी करायची यासंबंधी माहिती दिली.

सदर कार्यक्रमास भाजपा कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये,माधवदास निरंकारी अध्यक्ष शहर विचार मंच कुरखेडा, रामभाऊ वैद्य नगरसेवक,रविंद्र गोटेफोडे नगरसेवक,विद्यासागर निरंकारी नगरसेवक,दुर्गा गोटेफोडे नगरसेविका,जयश्री मडावी जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी,प्रियंका टेंभुर्णे व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेले परंपरागत व्यवसाय करणारे कारागीर उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!