Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीइस्राईल येथे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी - संकेतस्थळावर नोंदणी करून लाभ...

इस्राईल येथे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी – संकेतस्थळावर नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन- सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे घरगुती सहाय्यक क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध असून युवकांनी संकेतस्थळावर नोंदणी करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या २५ ते ४५ वर्षे वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.सोबतच उमेदवाराकडे (घरगुती सहायक) सेवांसाठी पारंगत,भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.याशिवाय भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी,नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण,तसेच जीडीए,एएनएम,जीएनएम,बी.एस्सी नर्सिंग,पोस्ट बी. एस्ससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहणार आहे.
इस्राईलला नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी
https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करून संधीचा लाभ घ्यावा,तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य,विकास रोजगार व उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली येथे सपंर्क साधावा; असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!