Monday, June 22, 2026
Homeगोंदियास्वतःवर गोळी झाडून पोलीस शिपायाने संपविली जीवनयात्रा...

स्वतःवर गोळी झाडून पोलीस शिपायाने संपविली जीवनयात्रा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय पोलीस हवालदाराने स्वतःवरच गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपविली असल्याची घटना काल,गुरुवारी १६ जानेवारीला दुपारच्या सुमारास दीड वाजे घडली.जयराम कारू पोरेटी वय ५० वर्षे,रा. शंभूटोला गटग्रामपंचायत मिसीपिर्री,ता.देवरी असे जीवनयात्रा संपविणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.सदर पोलीस हवालदार पवनीधाबे येथील पोलिस सशस्त्र दूरक्षेत्र या ठिकाणी कर्तव्यावर होता.
मिळालेल्या माहितीनुसार,पवनीधाबे येथील पोलिस सशस्त्र दूरक्षेत्र या ठिकाणी जयराम पोरेटी यांची काल, गुरुवारी दुपारी १ ते २ या वेळेत कर्तव्य(ड्युटी) होती.नियमित प्रमाणे ते कर्तव्यावर हजर झाले.कर्तव्य बजावत असतांना त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या एके ४७ सर्विस रायफलने स्वतःवरच गोळी घालून जीवनयात्रा संपविली आहे.त्यांनी जीवनयात्रा कां संपविली याचा उलगडा होणे बाकी असून सदर घटनेची नोंद नवेगावबांध पोलिसांनी केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक योगिता चाफले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसराच्या वेणा नदीत बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,नदीतील...

अवैध तंबाखू साठवणूक व विक्री करणाऱ्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रात गुटखा,पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने १९ जुलै २०१२ पासून सक्तीची बंदी लादली; मात्र गेल्या १४ वर्षांत ही बंदी कागदोपत्रीच...

शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी(बा.)वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील नागभीड तालुक्याच्या गिरगाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे,रा.गिरगाव,ता.नागभीड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!